सुरुवात
मंत्राकडून तंत्राकडे
अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या भरमसाठ प्रवेश शुल्क वाढल्यामुळे गरजू हुशार गुणवंत विद्यार्थी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेशा पासून वंचित राहु लागले
गुणवंत विद्यार्थी अभियांत्रिकी प्रवेशा पासुन वंचित राहु नयेत यासाठी श्री जानाई प्रतिष्ठान ची स्थापना वर्षे २००० साली करण्यात आली.
सांस्कृतिक कार्यक्रमातून अभियांत्रिकी शिक्षण उपक्रमातून अभियांत्रिकी शिक्षणासाठी अर्थसाह्य करण्यात आले यातून गेल्या २२ वर्षात १३५ विद्यार्थी अभियंते झाले आज ते विविध ठिकाणी इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत.
लातूर मध्ये लातूर पॅटर्न मधुन डाॅक्टर,इंजिनिअर बनू लागले पण १० वी १२ वीला कमी गुण घेतलेले नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे पुढे काय ? अशा विद्यार्थ्यांच्या पालका समोर ही समस्या निर्माण झाली.
याविद्यार्थ्यांना कमी कालावधी मध्ये रोजगार स्वयंरोजगार निर्माण व्हावा असे विद्यार्थी एक ते दोन वर्षात आत्मनिर्भर व्हावेत ,स्वत:च्या पायावर उभे रहावेत यासाठी श्री जानाई अभियांत्रिकी प्रतिष्ठान
संस्थेच्या वतीने श्री गुरूजी औद्योगीक प्रशिक्षण संस्थेची स्थापना वर्षे २०१९ साली करण्यात आली.
श्री गुरूजी आयटीआय औसा रोड छत्रपती चौक,वाडा हाॅटेलच्या मागे,उत्तरादि मठा जवळ वासनगांव रोड लातूर येथे ३.५ एकर जागेवर उभे आहे.
श्री जानाई प्रतिष्ठान सांस्कृतिक मंडळाचे ८ उच्च शिक्षित, इंजिनिअर, डाॅक्टर, प्राध्यापक, तरूण यशस्वी उद्योजक पूर्व पदाधिकारी एकत्र येत यांनी वर्षे २०१९ साली श्री गुरूजी आौद्योगीक प्रशिक्षण संस्थेची स्थापना केली.

उद्दिष्ट
विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकसीत करणे, त्यांना त्यांच्या पायावर उभा करून त्यांना राेजगार निर्माण करून देणे,
स्वावलंबी बनवुन कमी वेळेत स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणे
विध्यार्थ्यांचा सर्वात्मिक विकासाबरोबर त्यांच्या कलात्मक गुणांना व तांत्रीक गुणांना चालना देऊन, विध्यार्थ्यांचा विकास करणे
विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास करून त्यांचा मानसिक, बौद्धिक व शारीरिक विकास करणे. त्याचा सर्वागिण विकास कारणे. विद्यार्थ्यांमध्ये तंत्र शिक्षणासोबत नेतृत्व गुणांचा विकास करून आदर्श नागरिक निर्माण करणे
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन द्वारे विध्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करणे.
विद्यार्थ्यांच्या आतील शक्तीला प्रोत्साहित करण्यासाठी प्रार्थना व योगाचे धडे दिणे
हे आयटीआय संस्थांचे उद्दिष्ट आहे.
ध्येय
वाढत्या औद्योगीकरणात यांत्रिकीकरण व संगणकीकरणामुळे केवळ देशातच नव्हे तर जगभरात विविध स्वरूपातील तांत्रीक मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी आयटिआय मधुन विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण प्रशिक्षण देवुन औद्योगिकरणात कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देणे हे संस्थेचे मुख्य ध्येय आहे. समाजातील गुणवंत असुनही मार्क नसणारे
ग्रामीण शहरी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण मूल्यवर्धित तंत्रशिक्षण देणे.
त्यांना कमी कलावधी मध्ये तंत्रशिक्षण देऊन स्वयंपूर्ण बनवने, स्वत:च्या पायावर उभा करणे.कौशल्य शिक्षणातून त्यांना रोजगार स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे व त्यांना आत्मनिरेभर बनवणे
संस्थापक मंडळ
)%20(13).png)
प्लेसमेंट पार्टनर्स
.png)