फिजिओथेरपी विभाग
)%20(10).png)
संलग्नतेचे प्राधिकरण
NCVT
)%20(10).png)
उपलब्ध जागा
40
)%20(10).png)
कालावधी
एक वर्ष
)%20(10).png)
शैक्षणिक पात्रता
दहावी उत्तीर्ण
आपण या व्यवसायात काय शिकाल ?
-
फिजिओथेरपी अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना रूग्णांना उपचारासाठी लागणा-य विविध मशिनरीची संपूर्ण प्रात्यक्षिके घेतली जातात.
-
वॅक्स मशिन,आय आर रेडीएटर,शॉकवेव डायफ्राईम रेट टेन्स मसल्स नर्वस सेमी लेटर्स अल्ट्रासोनिक मशीन इत्यादी मशीनची पूर्ण माहिती देऊन त्यावर प्रत्यक्षके शिकवली जातात
-
अपघातानंतर रूग्णावर करावयाचे प्रथम उपचार व व्यायाम पध्दती,याचा पूर्ण अभ्यास व प्रात्यक्षिक घेतले जाते.
-
अपघातानंतर डोके फुटले असेल,हात, पाय,व बरगड्यांचे हाडे मोडली असतील किंवा मसल्स पेन होत असतील त्यावर त्यावर फिजिओथेरपी चे उपाय कसे करायचे हे शिकवले जाते.

स्वयं रोजगार उपलब्ध्द संधी कोणत्या ?
-
रिसर्चर.
-
सेल्फ एम्प्लॉयड प्रायव्हेट फिजिओथेरपिस्ट म्हणून देखील तुम्ही काम करू शकता.
-
स्पोर्ट्स फिजिओ रिहॅबिलिटेटर म्हणून देखील तुम्ही काम करू शकता.
-
उमेदवार स्वतःचे फिजिओथेरपी क्लिनिक देखील सुरू करू शकतात आणि प्रति सत्र INR 200-1000 दरम्यान कमाई करू शकतात.
-
फिजिओथेरपी साठी स्वतःचा एक छोटा दवाखाना ही सुरू करता येतो.

प्रशिक्षणानंतर उपलब्ध्द रोजगार संधी कोणत्या ?

-
फिजिओ थेरपी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली फिजिओ थेरपी टेक्निशियन म्हणून काम करण्याची संधी.
-
प्रत्येक मोठ्या हॉस्पिटल मध्ये फिजिओथेरपी विभाग अनिवार्य आहे.या विभागात फिजिओथेरपी असीस्टंट म्हणून नौकरीची संधी उपलब्ध आहे.
-
बहविकलांग शाळेमध्ये फिजिओथेरपी टेक्निशियन म्हणून तज्ज्ञ फिजिओथेरपी डॉक्टरांचे सहाय्यक म्हणून संधी उपलब्ध आहे.
-
अपोलो हॉस्पिटल्स, फिजिओथेरपी असोसिएट्स, ख्रिश्चन मेडिकल कॉलेज,ग्लेनेगल्स ग्लोबल हॉस्पिटल्स इ. हे टॉप रिक्रुटर असून त्यामध्ये संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे

पुढील शिक्षणाच्या संधी कोणत्या ?
-
IPU CET: IPU CET ही इंद्रप्रस्थ विद्यापीठाची सामाईक प्रवेश परीक्षा आहे. बीपीटी आणि एमपीटी ऑफर करणारी सर्व आयपी-संलग्न महाविद्यालये. उमेदवाराने IPU CET प्रवेश परीक्षेत बसणे आवश्यक आहे.
-
BCECE: BCECE ही राज्यस्तरीय प्रवेश चाचणी गुण स्वीकारणारी बिहार एकत्रित प्रवेश स्पर्धा परीक्षा आहे.
-
LPUNEST: LPUNEST ही राष्ट्रीय प्रवेश आणि शिष्यवृत्ती परीक्षा आहे जी इच्छूकांना काही अभ्यासक्रमांसाठी आणि बहुतेक कार्यक्रमांसाठी शिष्यवृत्ती उद्देशांसाठी पात्र होण्यासाठी द्यावी लागते. परीक्षेची पद्धत ऑनलाइन आहे.
-
CPNET: CPNET ही संयुक्त पॅरामेडिकल, फार्मसी आणि नर्सिंग प्रवेश परीक्षा आहे, ही एक राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा आहे, जी उत्तर प्रदेश वैद्यकीय विज्ञान विद्यापीठाद्वारे घेतली जाते. CPNET ऑफलाइन पद्धतीने आयोजित केले जाते.